महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

श्रीलंकेच्या संघासाठी पाकने लावला 'कर्फ्यू', गंभीरने व्हिडिओ शेअर करत उडवली खिल्ली - Gautam Gambhir on Pakistan

भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लंकेच्या संघाला कशापध्दतीने सुरक्षा देण्यात आली आहे. याची परिस्थीती दिसत आहे. गंभीरने या व्हिडिओसोबत, एवढं काश्मिर, काश्मिर केलं की कराची विसरुन गेले, अशा आशयाचा मजकूर लिहीत पाकची खिल्ली उडवली आहे.

श्रीलंकेच्या संघासाठी पाकने लावला 'कर्फ्यू' , गंभीरने व्हिडिओ शेअर करत उडवली खिल्ली

By

Published : Oct 1, 2019, 5:05 PM IST

नवी दिल्ली - २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर बंदी घालण्यात आली आणि पाकचे होम ग्राउंड दुबईला करण्यात आले. पण, पाकिस्तानने सुरक्षेची हमी घेतल्यानंतर लंकेच्या संघाने पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी होकार दिला. सध्या लंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून पाकिस्तानने लंकेच्या संघाला कडक सुरक्षा पुरवली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा - शिनवारीची भेदक गोलंदाजी, पाकिस्तानची लंकेवर ६७ धावांनी मात

भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लंकेच्या संघाला कशापध्दतीने सुरक्षा देण्यात आली आहे. याची परिस्थीती दिसत आहे. गंभीरने या व्हिडिओसोबत, एवढं काश्मिर, काश्मिर केलं की कराची विसरुन गेले, अशा आशयाचा मजकूर लिहीत पाकची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, लंकेच्या संघाला कडक सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षेच्या ताफ्यात अॅम्ब्युलन्सदेखील आहे. हा व्हिडिओ कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने व्हिडिओ शूट केला आहे. ताफ्यातील अॅम्ब्युलन्स पाहून व्हिडिओ शूट करणारा म्हणतो की, इतकी सुरक्षा असतानाही काही झाले तर अॅम्ब्युलन्सची सोय आहे. म्हणजेच कडक सुरक्षा असूनही हल्ल्याचा धोका वाटतो.

हेही वाचा - आयपीएल २०२० : लिलावाची तारीख ठरली, खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे असणार ८८ कोटी!

ABOUT THE AUTHOR

...view details