महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकची नाचक्की, लाईव्ह सामन्यादरम्यान दोन वेळा वीज पुरवठा खंडीत - पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुध्द श्रीलंका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात दोन वेळा मैदानावरील विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे सामन्यामध्ये अडथळा निर्माण झाला.

पाकची नाचक्की, लाईव्ह सामन्यादरम्यान दोन वेळा वीज पुरवठा खंडीत

By

Published : Sep 30, 2019, 11:54 PM IST

कराची - पाकिस्तानमध्ये बऱ्याच वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत आहेत. श्रीलंकेचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर नाचक्कीची नामुश्की ओढावली.

कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुध्द श्रीलंका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात दोन वेळा मैदानावरील विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे सामन्यामध्ये अडथळा निर्माण झाला.

हेही वाचा -'त्या' सेंच्युरीसाठी वापरली सचिनची बॅट, आजही आफ्रिदीच्या घरी

पहिल्या वेळा जेव्हा विद्युत पुरवठा खंडीत झाला, तेव्हा सामना १५-२० मिनिटे थांबवण्यात आला. त्यानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरुळीत झाला. दुसऱ्यांदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर खेळाडूंनी खेळपट्टीवरच बसकण मारली आणि वीज पुरवठा सुरूळीत होण्याची वाट पाहिली.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ४ वर्षानंतर यजमानपद भूषवत आहे. मैदानावरील वीज पुरवठा वारंवार खंडीत झाल्याने, खेळाडूंसह प्रेक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ७ बाद ३०५ धावा केल्या आणि लंकेसमोर ३०६ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, लंकेचा संघ २३८ धावांवर आटोपला.

हेही वाचा -बाबर आझमने तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, असा कारनामा करणारा पहिला आशियायी खेळाडू

ABOUT THE AUTHOR

...view details