रावलपिंडी - पाकिस्तान संघाने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विजयी संघ कायम ठेवला आहे. उभय संघात उद्या (गुरूवार ता. ४) पासून रावळपिंडीत दुसरा सामना खेळला जाणार आहे.
पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव करत दोन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील कसोटी मालिका संपल्यानंतर ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, उभय संघात पाकिस्तानमध्ये २००७ ला मालिका झाली होती. या दोन सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवला होता.