कराची -पाकिस्तान संघाचा वेनवान गोलंदाज मोहम्मद आमिरने निवृत्ती जाहीर केली आहे. आमिरने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे. आमिर आता फक्त पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातून खेळताना दिसेल.
भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आमिर निवृत्त! - pcb
आमिरने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे.
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत २७ वर्षीय आमिरने चांगले प्रदर्शन केले होते. 'संघासाठी खेळायला मिळाल्याने मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. आता मी माझे संपूर्ण लक्ष एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटवर केंद्रीत करणार आहे', असे त्याने म्हटले आहे. तो पुढे म्हणाला, 'यापुढे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु होईल. त्यामुळे निर्णय घेणे सोपे नव्हते. आता जर, मी निवृत्त झालो तर नव्या गोलंदाजांना संधी मिळेल. त्यामुळे निवड समितीला देखील चांगले गोलंदाज निवडता येतील.'
आमिरने २००९ साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ३६ कसोटीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात आमीरने ११९ बळी घेतले. वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्जस्टन कसोटीत ४४ धावांत घेतलेले ६ बळी ही आमिरची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.