महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शोएब मलिक म्हणतो, ''जागतिक क्रिकेटला भारत-पाक मालिकेची नितांत गरज'' - भारत-पाक मालिका शोएब मलिक न्यूज

शोएब एका मुलाखतीत म्हणाला, ''या दोन देशांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या अ‌ॅशेस मालिकेप्रमाणे एखादी मालिका असावी. जग या मालिकेची वाट पाहत आहे. अ‌ॅशेसशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटबद्दल विचार करू शकतात का? दोन्ही मालिका उत्कटतेने खेळल्या जातात. या मालिकेच्या भूतकाळाचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे आम्ही खेळत नसल्यामुळे लाज वाटते आहे.''

pak cricketer shoaib malik speaks about india pakistan series
जागितक क्रिकेटला भारत-पाक मालिकेची निंतात गरज - मलिक

By

Published : Jun 23, 2020, 3:28 PM IST

लाहोर - क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका लवकरात लवकर सुरू व्हावी, असे मत पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक याने व्यक्त केले आहे. जागतिक क्रिकेटला या मालिकेची नितांत गरज असल्याचेही तो म्हणाला.

शोएब एका मुलाखतीत म्हणाला, ''या दोन देशांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या अ‌ॅशेस मालिकेप्रमाणे एखादी मालिका असावी. जग या मालिकेची वाट पाहत आहे. अ‌ॅशेसशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटबद्दल विचार करू शकतात का? दोन्ही मालिका उत्कटतेने खेळल्या जातात. या मालिकेच्या भूतकाळाचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे आम्ही खेळत नसल्यामुळे लाज वाटते आहे.''

दोन्ही आशियाई देशांनी राजकीय मुद्द्यांमुळे 2007 पासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ फक्त आमनेसामने सामने आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details