महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

माझी मृत्यूची बातमी निराधार - मोहम्मद इरफान - irfan speaks about fake death

इरफानने ट्विटरवर लिहिले, "कार अपघातात माझा मृत्यू झाला असल्याची ही निराधार बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. यामुळे माझे कुटुंब आणि मित्र खूप अस्वस्थ झाले. त्यानंतर मला सतत फोन येत आहेत. कृपया अशा गोष्टींपासून दूर राहा आणि कोणताही अपघात झालेला नाही. आम्ही सुरक्षित आहोत."

pak cricketer mohammad irfan speaks about fake death news
माझी मृत्यूची बातमी निराधार - मोहम्मद इरफान

By

Published : Jun 22, 2020, 3:12 PM IST

लाहोर -पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने कार अपघातात मृत्यू झाल्याच्या बातम्यांना अफवा म्हटले आहे. रविवारी सोशल मीडियावर इरफानच्या मृत्यूबद्दल अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या होत्या. मात्र, इरफानने या बातम्यांना पूर्णविराम दिला. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांनी बनावट बातम्या पसरवू नयेत, अशी विनंती केली.

इरफानने ट्विटरवर लिहिले, "कार अपघातात माझा मृत्यू झाला असल्याची ही निराधार बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. यामुळे माझे कुटुंब आणि मित्र खूप अस्वस्थ झाले. मला सतत फोन येत आहेत. कृपया गोष्टींपासून दूर राहा आणि कोणताही अपघात झालेला नाही. आम्ही सुरक्षित आहोत."

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 38 वर्षीय इरफानने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा सामना खेळला होता. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार कसोटी, 60 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर एकूण 109 बळी जमा आहेत.

विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ट्विट करून कर्णबधिर क्रिकेटर मोहम्मद इरफान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. मात्र, चाहत्यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानबद्दल हा गैरसमज केला.

ABOUT THE AUTHOR

...view details