महाराष्ट्र

maharashtra

दिग्गज स्मिथला बाद करण्यासाठी मिसबाहने आखलीय 'एक' रणनीती

By

Published : Nov 20, 2019, 8:20 AM IST

एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथने दमदार पुनरागमन केले असून त्याने यावर्षीच्या अ‌ॅशेस मालिकेत ७७४ धावा केल्या आहेत. आता तो पाकिस्तानविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.

दिग्गज स्मिथला बाद करण्यासाठी मिसबाहने आखलीय 'एक' रणनीती

ब्रिस्बेन -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्हन स्मिथला बाद करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने आपल्या गोलंदाजांना एक उपाय सांगितला आहे. 'स्मिथला बाद करण्यासाठी चेंडू योग्य ठिकाणी किंवा ऑफ स्टम्पच्या वर ठेवणे महत्वाचे आहे', असे मिसबाहने म्हटले आहे.

मिसबाह-उल-हक

हेही वाचा -गुलाबी चेंडू 'रिव्हर्स स्विंग' होण्यासाठी करण्यात आलाय 'हा' उपाय

एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथने दमदार पुनरागमन केले असून त्याने यावर्षीच्या अ‌ॅशेस मालिकेत ७७४ धावा केल्या आहेत. आता तो पाकिस्तानविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.

'जोपर्यंत स्मिथचा प्रश्न आहे, जगातील अव्वल फलंदाजांसाठी, गोलंदाजांना चेंडू योग्य ठिकाणी टाकावा लागेल. आमचे गोलंदाज आपली रणनीती योग्य प्रकारे राबवत आहेत आणि मला आशा आहे की यामुळे त्याच्यावर दबाव निर्माण होईल. त्यामुळे फलंदाज तुमचा आदर करेल आणि मग आपण त्यांना चूक करण्यास भाग पाडू शकतो', असेही मिसबाह म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details