लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठण्यात अयशस्वी ठरला. पाक संघाने ९ सामन्यामध्ये ५ सामने जिंकले, तरीही नेट रनरेटमुळे पाकचे उपांत्य फेरीचे स्वप्न अधुरे राहिले. भारतीय संघ इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात जिंकला तरच पाक उपांत्य फेरी गाठणार अशी गणिते होती. तेव्हा भारतीय संघ इंग्लंडकडून पराभूत झाला. यामुळे पाकच्या माजी खेळाडूंसह चाहत्यांनी, उपांत्य फेरीत पाकचा संघ नको असल्यानेच भारतीय संघ मुद्दामहून पराभूत झाला असल्याचा आरोप केला.
भारतीय संघ इंग्लडविरुध्द मुद्दाम हरला? पाक कर्णधार सरफराजने दिलं 'हे' उत्तर - icc 2019
इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात भारतीय संघ मुद्दाम हरला. याविषयी पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमदला तुझे मत काय? अशी विचारणा केली असता सरफराज म्हणाला, की भारतीय संघ इंग्लंडविरुध्द मुद्दामहून हरला असे मला वाटत नाही. इंग्लंडने विजयासाठी चांगला खेळ केला आणि ते विजयी ठरले, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
याविषयी पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमदला तुझे मत काय? अशी विचारणा केली असता सरफराज म्हणाला, की भारतीय संघ इंग्लंडविरुध्द मुद्दामहून हरला, असे मला वाटत नाही. इंग्लंडने विजयासाठी चांगला खेळ केला आणि ते विजयी ठरले, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
विश्वकरंडक स्पर्धेत 30 जूनला झालेल्या भारत विरुध्द इंग्लंड सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या चाहत्यांना भारतीय संघ विजयी व्हावा, असे वाटत होते. मात्र, स्पर्धेत अजेय असलेल्या भारतीय संघाला इंग्लंडने पराभूत केले. यामुळे भारतीय संघाला पाकिस्तान उपांत्य सामन्यात नको होता. म्हणून भारत मुद्दामहून हा सामना हरला, अशी टीका पाकच्या माजी खेळाडूंनी केली होती.