सिडनी - आयपीएलच्या समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यजमान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. भारताबरोबर अखेरच्या मालिकेत स्टार्कने सात डावांमध्ये १३ बळी मिळवले होते. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टार्कची कामगिरी त्याच्या संघातील सहकारी नॅथन लिऑन आणि पॅट कमिन्स यांच्या तुलनेत खराब झाली होती.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज
मागील वर्षी भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टार्कची कामगिरी त्याच्या संघातील सहकारी नॅथन लिऑन आणि पॅट कमिन्स यांच्या तुलनेत खराब झाली होती. यावेळी मात्र, स्टार्क पूर्णपणे सज्ज झाला आहे.
यावेळी मात्र, स्टार्क पूर्णपणे सज्ज झाला आहे. "मी आत्ता कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. यावर्षी मी शक्य तितक्या वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण माझे ध्येय ही एक कसोटी मालिका आहे. मला जास्त बळी घ्यायचे आहेत'', असे स्टार्क म्हणाला.
बाहेरील चर्चांकडे आपण लक्ष देत नसल्याचेही स्टार्कने सांगितले. तो म्हणाला, ''जोपर्यंत माझ्या आसपास माझे लोक आहेत, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत बाहेरच्या चर्चांना महत्त्व उरत नाही.'' गेल्या वर्षी शेफील्ड शिल्डच्या खेळांमध्ये केलेल्या तांत्रिक बदलांमुळे मदत झाली असल्याचेही स्टार्कने सांगितले.