महाराष्ट्र

maharashtra

आयपीएलमध्ये घातक गोलंदाजी कोणाची?...वॉर्नरने दिलं ‘हे’ उत्तर

वॉर्नरने सनरायजर्स हैदराबादकडे घातक गोलंदाजी असल्याचे म्हटले आहे. वॉर्नर या संघाचा कर्णधार आहे. शेवटच्या षटकात गोलंदाजी करणे ही त्याच्या संघाची सर्वात मोठी शक्ती असल्याचे वॉर्नर म्हणाला.

By

Published : Apr 24, 2020, 6:20 PM IST

Published : Apr 24, 2020, 6:20 PM IST

Our bowling in IPL is the best in the final overs said david warner
आयपीएलमध्ये घातक गोलंदाजी कोणाची?...वॉर्नरने दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमधील सर्वात घातक गोलंदाजी असलेल्या संघाची निवड केली आहे. इंग्लंडचा फलंदाज आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा जॉनी बेअरस्टो याच्याशी केलेल्या बातचीतमध्ये वॉर्नरने ही निवड केली.

वॉर्नरने सनरायजर्स हैदराबादकडे घातक गोलंदाजी असल्याचे म्हटले आहे. वॉर्नर या संघाचा कर्णधार आहे. शेवटच्या षटकात गोलंदाजी करणे ही त्याच्या संघाची सर्वात मोठी शक्ती असल्याचे वॉर्नर म्हणाला.

“आमची टीम विलक्षण आहे. आमच्या संघाबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. आमच्याकडे असे गोलंदाज आहेत जे सुरुवातीला चेंडू चांगला स्विंग करतात. आमची अंतिम षटकातील गोलंदाजी ही स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आहे”, असे वॉर्नर म्हणाला.

वॉर्नर आणि बेअरस्टोची सलामीची जोडी आयपीएल २०१९ च्या हंगामातील स्पर्धेतील सर्वात धोकादायक असल्याचे सिद्ध झाले होते. वॉर्नर म्हणाला, “मला विकेट्सदरम्यान वेगवान धाव घेणे आवडते आणि मला वाटते की विकेट्स दरम्यान धावा घेताना आपल्यात असलेली उर्जा आश्चर्यकारक आहे. तीसुद्धा आपली मजबूत बाजू आहे. बेअरस्टोनेही वॉर्नरशी सहमती दर्शवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details