मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा ब्रँड वन ८ कम्यूनने लॉकडाऊन दरम्यान ३० हजार लोकांना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये जे लोक संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांची पाकिटे तयार करत आहेत.
विराट कोहलीचा ब्रँड करणार ३० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था - virat kohli bring 30 thousand people news
यापूर्वी कोहली आणि त्याचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा साथीदार अब्राहम डिव्हिलियर्सने कोरोना लढ्यात निधी गोळा करण्यासाठी लीगच्या २०१६च्या हंगामात ऐतिहासिक भागीदारीदरम्यान वापरल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला होता.

डिव्हिलियर्सने स्वाक्षरी केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि जाहीर केले, की या लिलावातील निधी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विरूद्धच्या लढाईत वापरला जाईल. कोहली आणि डिव्हिलियर्सने गुजरातविरूद्ध केलेली २२९ धावांची भागिदारी ही आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी भागिदारी मानली जाते. दोन्ही फलंदाजांनी शतके ठोकली होती.