महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तब्बल ८ वर्षांपूर्वी सचिनच्या 'या' निर्णयाने क्रिकेटविश्व झाले होते भावूक!

सचिनने १८ मार्च २०१२ रोजी एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला. ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकिस्तानविरूद्ध सचिनने ४८ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. सचिनने यानंतर २३ डिसेंबर २०१२ रोजी एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा केली.

On this day, Sachin Tendulkar played his last ODI
तब्बल ८ वर्षांपूर्वी सचिनच्या 'या' निर्णयाने क्रिकेटविश्व झाले होते भावूक!

By

Published : Mar 18, 2020, 11:53 AM IST

मुंबई - क्रिकेट विश्वात धावांचा नेहमी पाऊस पाडणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनने त्याच्या कारकिर्दीत शतकांचे शतक करत या विक्रमात जगातील एकमेव क्रिकेटपटू होण्याचा मान पटकावला. अशा अनेक खास विक्रमांचा 'बादशाह' असलेल्या सचिनने बरोबर ८ वर्षापुर्वी मोठा निर्णय घेतला होता.

हेही वाचा -'ज्वालामुखीं'ची चढाई करणाऱ्या गिर्यारोहकाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

सचिनने १८ मार्च २०१२ रोजी एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला. ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकिस्तानविरूद्ध सचिनने ४८ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. सचिनने यानंतर २३ डिसेंबर २०१२ रोजी एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा केली. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गड्यांनी मात दिली.

सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध १९८९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी १९९४ साली सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. १९९४ साली श्रीलंकेत झालेल्या सिंगर वर्ल्ड सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सचिनने ११० धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार २ षटकार लगावले.

१६ नोव्हेंबर २०१३ म्हणजे २४ वर्षांनी सचिनने क्रिकेटला बाय बाय केले. सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details