नवी दिल्ली - भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2017 च्या विजय हजारे ट्रॉफीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गोवा संघाविरूद्ध बुमराहने केलेल्या दमदार फलंदाजीचा हा व्हिडिओ आहे. या सामन्यात त्याने 20 चेंडूत 42 धावा चोपल्या होत्या.
'यॉर्करकिंग' बुमराहच्या 20 चेंडूत 42 धावा!...पाहा व्हिडिओ - jasprit bumrah in vijay hazare trophy news
भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या मागणीवरुन हा व्हिडिओ बुमराहने ट्विटरवर शेअर केला आहे. बुमराहच्या या वादळी खेळीमुळे गुजरातने 9 गड्यांच्या मोबदल्यात 277 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना गोव्याचा संघ 199 धावांवर सर्वबाद झाला होता.
'यॉर्करकिंग' बुमराहच्या 20 चेंडूत 42 धावा!...पाहा व्हिडिओ
भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या मागणीवरुन हा व्हिडिओ बुमराहने ट्विटरवर शेअर केला आहे. बुमराहच्या या वादळी खेळीमुळे गुजरातने 9 गड्यांच्या मोबदल्यात 277 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना गोव्याचा संघ 199 धावांवर सर्वबाद झाला होता.
युवराजने इंस्टाग्रामवर झालेल्या संभाषणादरम्यान बुमराहला फलंदाजीसाठी टोमणे मारले होते. युवराजला प्रत्युत्तर म्हणून बुमराहने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.