महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Karwa Chauth 2019: विराटने ठेवला अनुष्कासाठी उपवास, पाहा क्रिकेटर्सचा करवा चौथ - Virat Kohli and Anushka Sharma Celebration Karwa Chauth

विराटने शेअर केलेल्या फोटोला 'जे सोबत उपवास करतात ते सोबत हसतात.' असे गोड कॅप्शनही दिले आहे. अनुष्का शर्मानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याला तिने 'माझा जीवनाचा आणि त्यानंतरचाही साथीदार, तसेच आजच्या उपहासाचा साथीदार' असे कॅप्शन दिले आहे.

विराटने ठेवला अनुष्कासाठी करवा चौथचा उपवास, पाहा क्रिकेटर्सचा करवा चौथ

By

Published : Oct 18, 2019, 8:56 AM IST

Updated : Oct 18, 2019, 11:12 AM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत उपवास करत करवा चौथ साजरा केला. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

विराटने शेअर केलेल्या फोटोला 'जे सोबत उपवास करतात ते सोबत हसतात देखील.' असे गोड कॅप्शनही दिले आहे. अनुष्का शर्मानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याला तिने 'माझा जीवनाचा आणि त्यानंतरचाही साथीदार, तसेच आजच्या उपहासाचा साथीदार' असे कॅप्शन दिले आहे.

विराट कोहली आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले आहे. मागील वर्षीही दोघांनी करवा चौथचा साजरा केला होता. यावर्षीही करवा चौथ साजरा करत ती परंपरा कायम राखली.

दरम्यान, विराटसह रोहित शर्मानेही पत्नी रितिका सजदेहसोबत फोटो शेअर केला आहे. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पत्नी प्रतिमा सिंह सोबत करवा चौथ साजरा केला. त्यानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो शेअर केला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवननेही फोटो शेअर करत पत्नी आयेशाला करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा माजी स्फोट फलंदाज विरेंद्र सेहवागनेही पत्नी आरतीसोबत फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला त्याने , 'बहुत गजब, प्रेम और श्रद्धा' असे कॅप्शन दिले आहे.

पति-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो.

हेही वाचा -भारताविरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा, 'या' अनुभवी खेळाडूकडे नेतृत्व

हेही वाचा -Exclusive : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित पाहा...

Last Updated : Oct 18, 2019, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details