दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ओमानचा खेळाडू युसूफ अब्दुर्रहीम अल बलुशीवर सात वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. सामना फिक्सींग करण्याच्या प्रयत्नात गुंतल्याबद्दल आयसीसीने ही कारवाई केली आहे.
फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटपटूवर ७ वर्षाची बंदी, आयसीसीची कारवाई - खेळाडू युसूफ अब्दुर्रहीम अल बलुशीवर बंदी न्यूज
आयसीसीने ओमानचा खेळाडू युसूफ अब्दुर्रहीम अल बलुशीवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. अल बलुशीने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केलेले चार आरोप स्वीकारले आहेत.
फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटपटूवर ७ वर्षाची बंदी, आयसीसीसीची कारवाई
अल बलुशीने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केलेले चार आरोप स्वीकारले आहेत. हे सर्व आरोप संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या २०१९ च्या पुरुष टी-२० विश्व करंडक पात्रता स्पर्धेशी संबंधित आहेत.
सामना फिक्स करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे आणि फिक्सिंगला उत्तेजन देणे या अंतर्गत बलूशी दोषी आढळला आहे. २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर बलूशी हा ओमानकडून सातत्याने खेळला नव्हता.