चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीआधी इंग्लंड संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंग्लंडचा फलंदाज ओली पोप भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघात दाखल झाला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की, पोप ऑगस्ट २०२० मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. यातून आता सावरला असून भारताविरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
२३ वर्षीय ओली पोप इंग्लंड संघाच्या सराव सत्रात भाग घेत आहे. त्याने आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याने ३७.९४ च्या सरासरीने ६४५ धावा केल्या आहेत.