ऑकलंड - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचे बिगूल शुक्रवारी वाजणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची रणनीती स्पष्ट केली. त्याला आयोजित पत्रकार परिषदेत, विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोहलीने झक्कास उत्तर देत मनं जिंकली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्वावर विराट म्हणाला, 'विश्व करंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याचा विचारही डोक्यात नाही. न्यूझीलंड हा प्रतिस्पर्धीच असा आहे की तुमच्या डोक्यात असा विचारच येऊ शकत नाही. मैदानावर स्पर्धात्मक खेळ करणे एवढेच महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट संघ कसा असावा याची प्रचिती न्यूझीलंड संघाकडे पाहिल्यावर येते.'
न्यूझीलंडने विश्व करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, याचा आम्हाला आनंदच झाला होता. त्यामुळे पराभवाची परतफेड वगैरे करण्याचे आमचे लक्ष्य नाही, असे विराटही म्हणाला. दरम्यान, इंग्लंडमध्ये झालेल्या विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता.
उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या ८ बाद २३९ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४९.३ षटकात २२१ धावात तंबूत परतला होता. या पराभवाबरोबर भारतीय संघाचे विश्व करंडक जिंकण्याचं स्वप्न भंगलं होते. त्यानंतर प्रथमच भारतीय संघ न्यूझीलंडशी सामना भिडणार आहे. भारत-न्यूझीलंड संघात ५ टी-२०, तीन एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक -