महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराटने फॉलो-ऑन दिला तर, तब्बल १० वर्षानंतर आफ्रिकेवर ओढावणार नामुष्की - follow-on on news

कर्णधार विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला, तर आफ्रिकेवर तब्बल १० वर्षानंतर फॉलो-ऑनची नामुष्की ओढावेल. या आधी २००८ मध्ये इंग्लंडने आफ्रिकेला लॉर्ड्सच्या मैदानावर फॉलो-ऑन दिला होता.

विराटने फॉलो-ऑन दिला तर... तब्बल १० वर्षानंतर आफ्रिकेवर ओढावणार नामुष्की

By

Published : Oct 12, 2019, 7:31 PM IST

पुणे - गहुंजे मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या ६०१ धावांच्या डोंगरापुढे आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला. तळाच्या फलंदाजांच्या कडवी झुंजीमुळे आफ्रिकेला सन्माजनक धावसंख्या उभारता आली. केशव महाराज आणि वर्नन फिलँडर यांनी नवव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी केली. तेव्हा भारतीय फिरकीपटू अश्विनने ही जोडी केशव महाराजला बाद करुन फोडली अन् आफ्रिकेचा डाव २७५ धावांवर आटोपला. भारताकडे सद्यस्थितीत ३२६ धावांची आघाडी आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आफ्रिकेला फॉलो-ऑन देण्याची संधी आहे.

टीम इंडिया आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात..
कर्णधार विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला तर आफ्रिकेवर तब्बल १० वर्षानंतर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवेल. या आधी २००८ मध्ये इंग्लंडने आफ्रिकेला लॉर्ड्सच्या मैदानावर फॉलो-ऑन दिला होता.

दरम्यान, भारतीय संघाने आफ्रिकेविरुध्द पहिल्या डावात, कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक आणि मयांक अग्रवालच्या शतकी खेळीच्या जोरावर ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केला. तेव्हा आफ्रिकेचा संघ पहिला डावात २७५ धावा करू शकला. भारताकडून अश्विन ४, उमेश यादव ३, मोहम्मद शमी २ आणि जडेजाने १ गडी बाद केला. भारतीय संघाकडे पहिल्या डावात ३२६ धावांची आहे. उद्या चौथ्या दिवशी कर्णधार कोहली फॉलो-ऑन देणार की नाही, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

गडी बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना टीम इंडिया..

ABOUT THE AUTHOR

...view details