नवी दिल्ली -पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात होणार नसल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे क्रीडाविश्वातील अनेक संस्था आगामी आर्थिक परिस्थितीचा विचार करून खेळाडूंच्या मानधनाविषयी निर्णय घेत आहेत. बीसीसीआयनेही भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात होणार नसल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानी खेळाडूंच्या मानधनात कपात नाही - पीसीबी - pakistan cricket board no respite news
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने याचा खुलासा केला. कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. परंतु चालू आर्थिक वर्षात पीसीबी खेळाडूंचे वेतन कमी करणार नाही. पीसीबीचे सध्याचे आर्थिक वर्ष ३० जूनपर्यंत चालणार आहे.

आमचे आर्थिक वर्ष १ जुलै ते ३० जून पर्यंत चालते. सर्व खेळाडूंचे करार (मध्यवर्ती आणि घरगुती) ३० जून पर्यंत आहेत. २०१९-२० आर्थिक वर्षात खेळाडूंच्या मानधनात कोणतीही कपात होणार नाही. आम्ही हे सुनिश्चित केले आहे. पीसीबी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.