मुंबई -भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह इंग्लंडसाठी धोकादायक नाहीत. तर रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे तिघे इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू माँटी पानेसर याने व्यक्त केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याआधी पानेसर म्हणाला की, 'अजिंक्य रहाणेची फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्य पाहून मी प्रभावीत झालो आहे. तसेच चेतेश्वर पुजारा प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यात सक्षम आहे. याशिवाय रविचंद्रन अश्विन दोन्ही बाजूने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता तर आहेत यासोबत तो एक चतूर गोलंदाज आहे.'