मेलबर्न- कोरोना व्हायरसच्या भितीने इंग्लंड त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. याउलट ऑस्ट्रेलिया संघाने आम्ही कोरोनाला भीत नाही. आम्ही खेळाडू असो अथवा चाहते, त्यांच्याशी हस्तांदोलन करणार, असे सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले की, 'आम्ही हस्तांदोलन टाळणार नाही. आमच्याकडे मुबलक प्रमाणात हॅन्ड सॅनेटायझर्स उपलब्ध आहे.' दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.