दुबई- कोरोना विषाणूने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियात होणारा आगामी टी-२० विश्वकरंडक रद्द करायचा का? याबाबत आयसीसीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुढील महिन्यापर्यंत, कोरोनाची स्थिती पाहून विश्वकरंडकाच्या आयोजनाबाबतचा विचार केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
टी-२० विश्वकरंडक रद्द केला जाईल, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयावर बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे लक्ष होते. कारण, विश्वकरंडक रद्द झाल्यावरच बीसीसीआयला आयपीएल खेळवता येणार आहे. पण विश्वकरंडकाचा निर्णय आता पुढील महिन्यात होणार आहे. दुसरीकडे जर टी-२० विश्वकरंडक खेळवला गेला तर या वर्षी तरी आयपीएल होणार नाही, असे दिसते.
बीसीसीआय आयपीएल आयोजन कोणत्या महिन्यात करायचे यावर, विचार करत आहे. टी-२० विश्वकरंडक रद्द झाल्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत होती. याशिवाय कोरोनामुळे आयपीएल जर भारतामध्ये खेळवण्यात येणार नसेल तर त्यासाठी पर्यायही शोधले गेले होते. आयपीएल भरवण्यासाठी श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांनी बीसीसीआयपुढे प्रस्तावही ठेवला आहे. पण यातील एक पर्याय असलेल्या विश्वकरंडक रद्द बाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेतला जाणार आहे.
बैठकीत काय झाली चर्चा -