दुबई - गुरुवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पूरनने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
VIDEO : पूरनने झळकावले यंदाच्या आयपीएलचे वेगवान अर्धशतक
हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पूरनने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम लोकेश राहुलच्या नावावर आहे. त्याने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
पूरनने पंजाबच्या डावातील नवव्या षटकात चार षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम लोकेश राहुलच्या नावावर आहे. त्याने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. युसुफ पठाणने १५ चेंडूत आणि सुरेश रैनाने १६ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. पूरन, ख्रिस गेल, हार्दिक पांड्या, अॅडम गिलख्रिस्ट यासह एकूण आठ फलंदाजांनी १७ चेंडूत अर्धशतके ठोकली आहेत.
सनरायजर्स हैदराबादने पंजाबवर ६९ धावांनी मात करत हा सामना एकतर्फी जिंकला. २०२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ १३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पंजाबकडून निकोलस पूरनने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. परंतू इतर फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे पंजाबला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पूरनने ३७ चेंडूत ७७ धावा केल्या.