महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गोळीबाराच्या घटनेनंतर न्यूझीलंड-बांगलादेश दरम्यानचा तिसरा कसोटी सामना रद्द

शनिवारी (१६ मार्च) सुरू होणारा तिसरा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला आहे.

By

Published : Mar 15, 2019, 1:07 PM IST

कसोटी ११

ख्राइस्टचर्च- न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात १६ मार्चला ख्राइस्टचर्च येथे कसोटी मालिकेतील शेवटचा तिसरा सामना होणार होता. या सामन्याआधी बांगलादेशचा संघ शहरातील अल-नूर-मशिदीत गेले होते. परंतु, खेळाडू गेलेल्या मशिदीवर अज्ञात इसमाने जोरदार गोळीबार केला. या घटनेतून बांगलादेशचा संघ सुखरुप बचावला असला तरीही उद्याचा होणार तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती देताना लिहिले, की ख्राइस्टचर्च येथे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रभावित झालेल्या नागरिकांच्या आणि मित्रांप्रती आमच्या संवेदना आहेत. शनिवारी (१६ मार्च) सुरू होणारा तिसरा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला आहे. दोन्ही संघाचे खेळाडू आणि व्यवस्थापनाचे सदस्य सुरक्षित आहेत.

मशिदीत झालेल्या घटनेनंतर बांगलादेशचे खेळाडू तमिम इक्बाल आणि मुशफिकूर रहिम यांनी ट्वीटरद्वारे सुरक्षित असल्याची माहिती दिली. तमिमने लिहिले, पूर्ण संघाला हल्लातून वाचवण्यात आले. खूप भीतीदायक अनुभव होता. आमच्यासाठी प्रार्थना करा.

मुशफिकूरने लिहिले, ख्राइस्टचर्च येथे मशिदीत झालेल्या गोळीबारातून अल्लाहने आम्हाला वाचवले. आम्ही खूप भाग्यशाली आहोत. आयुष्यात पुन्हा कधी अशी घटना होवू नये. आमच्यासाठी प्रार्थना करा.

ABOUT THE AUTHOR

...view details