महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाची न्यूझीलंड भ्रमंती, 'या' खेळाडूने शेअर केले अनुष्कासोबतचे फोटो - भारताचा न्यूझीलं दौरा २०२०

भारतीय खेळाडूंनी या सराव सामन्याआधी न्यूझीलंडची भ्रमंती केली. यावेळी खेळाडूंसोबत विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही उपस्थित होती. मोहम्मद शमीने या क्षणाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.

new zealand vs india test series ahead of series team india visits blue springs in putaruru
टीम इंडियाची न्यूझीलंड भ्रमंती, 'या' खेळाडूने शेअर केले अनुष्कासोबतचे फोटो

By

Published : Feb 13, 2020, 4:25 PM IST

वेलिंग्टन- भारतीय संघ सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघात टी-२० आणि एकदिवसीय मालिका पार पडली. त्यानंतर दोन्ही संघ आता २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान या कसोटी मालिकेआधी १४ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय सराव सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय खेळाडूंनी या सराव सामन्याआधी न्यूझीलंडची भ्रमंती केली. यावेळी खेळाडूंसोबत विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही उपस्थित होती. मोहम्मद शमीने या क्षणाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.

शमीने शेअर केलेला फोटो न्यूझीलंडमधील ब्लू स्प्रिंग पुटूटूरुचा आहे. या फोटोत शमीसह नवदीप सैनी, विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसून येत आहेत. दरम्यान बीसीसीआयनेही एक फोटो शेअर केला असून त्यात संपूर्ण भारतीय संघ दिसून येत आहे. हा फोटोही ब्लू स्प्रिंग पुटूटूरुचा आहे.

कसोटी मालिका खेळण्यासाठी रवीचंद्रन अश्विन, वृद्धीमान साहा, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. ते भारतीय एकदिवसीय संघाचे सदस्य नव्हते. भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत ५-० ने व्हाईटवॉश दिला. तेव्हा न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत भारताला ३-० असा व्हाईटवॉश देत परतफेड केली.

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार ), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिला कसोटी सामना २१-२५ फेब्रुवारी, वेलिंग्टन
  • दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च, ख्राइस्टचर्च

हेही वाचा -

IPL २०२० : आरसीबी नव्या नावासह मैदानात उतरणार?, विराट नाराज

हेही वाचा -

SA vs ENG : लुंगी एनगिडीची कमाल, आफ्रिकेने रोमांचक सामन्यात इंग्लंडचा १ धावेनं केला पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details