वेलिंग्टन - भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. आज (गुरूवार) न्यूझीलंड निवड समितीने १४ सदस्यीय संघाची घोषणा केली असून यात ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि जिमी निशन यांना वगळण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज हामिश बेनेट याला संभाव्य संघात संधी देण्यात आली आहे. केन विल्यमसनची टी-२० संघात वापसी झाली आहे.
भारत-न्यूझीलंड संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला २४ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. भारतीय निवड समितीने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यानंतर आता न्यूझीलंडनेही आपल्या संघाची घोषणा केली. यात बोल्ट आणि फर्ग्युसन यांना संघात स्थान मिळाले नाही. दरम्यान, दोघेही दुखापतग्रस्त असून सद्या ते दुखापतीतून सावरत आहेत. यामुळे संधी देण्यात आली नसल्याचे समजते.
न्यूझीलंडच्या टी-२० संघात केन विल्यमसनची वापसी झाली आहे. विल्यमसन नोव्हेंबर २०१९ मध्ये इंग्लंड संघाविरुद्धच्या टी-२० मालिका खेळला नव्हता. टॉम ब्रुसची चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. तर कॉलिन डी ग्रँडहोमने पहिल्या तीन सामन्यासाठी संघात जागा मिळवली आहे. जिमी निशमला मात्र, टी-२० संघातून वगळण्यात आले आहे.
- असा आहे भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ -
केन विल्यमसन (कर्णधार), हामिश बेनेट, टॉम ब्रूस (चौथ्या-पाचव्या सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम (पहिल्या तीन सामन्यांसाठी ), मार्टिन गुप्टिल, स्कॉट कगीलीन, डारेल मिचेल, कॉलिन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, मिशेल सँटनर, टीम सीफर्ट, इश सोढी आणि टीम साउदी. - असा आहे भारताचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर.
हेही वाचा -भारतीय संघाच्या 87 वर्षीय 'सुपरफॅन' चारुलता पटेल यांचं निधन
हेही वाचा -INDvsAUS : टीम इंडियाला धक्का, रिषभ पंत दुसऱ्या वनडेला मुकणार