महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ : टीम इंडिया 'विराट' विजयाच्या ध्येयासह मैदानात

भारतील सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडला आहे. यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉ सलामीला येण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीने याचे संकेत दिले आहेत.

new zealand vs india 1st odi india in new zealand 2019-20
IND vs NZ : 'विराट' विजयाच्या ध्येयासह टीम इंडिया सज्ज

By

Published : Feb 4, 2020, 11:15 PM IST

हॅमिल्टन- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेनंतर तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी होईल. भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ५-० ने सफाया केला. आता एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

भारतील सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडला आहे. यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉ सलामीला येण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीने याचे संकेत दिले आहेत.

कुठे आहे सामना -
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

किती वाजता होणार सामन्याला सुरूवात -
उभय संघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता सुरूवात होईल. नाणेफेक अर्धा तास म्हणजे सकाळी ७ वाजता करण्यात येईल.

  • अशी असून शकते टीम इंडिया -
    विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि नवदीप सैनी.
  • असा असू शकतो न्यूझीलंडचा संघ -
    टॉम लाथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, कॉलिन डि ग्रँडहोम, जिमी नीशाम, स्कॉट कुगलेइजन, टॉम ब्लंडेल, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, हामिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउदी, काइल जेमीसन आणि मार्क चॅपमन.

हेही वाचा -U-१९ विश्वकरंडक : टीम इंडियाची पाकवर 'यशस्वी' मात, अंतिम फेरीत धडक

हेही वाचा -पाकविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या 'या' खिलाडूवृत्तीचे चाहत्याकडून कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details