वेलिंग्टन - वेगवान गोलंदाज नील वेगनर आणि ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यापुढे दुसऱ्या कसोटीतील बांगलादेशाचा पहिला डाव २११ धावांवर आटोपला. पावसामुळे पहिले दोन दिवस खेळ होऊ शकल्याने तिसऱ्या दिवशी रविवारी खेळास सुरुवात झाली.
वेगनर-बोल्टचा भेदक मारा, बांगलादेशचा डाव २११ धावांवर आटोपला - undefined
बांगलादेशचे इतर ९ गडी ९२ धावा काढून बाद झाले. यष्टीरक्षक लिटन दासने ३३ धावांची खेळी करून संघास हातभार लावला.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. बांगलादेशच्या सलामी जोडीने ७५ धावांची सलामी दिली. तमीम इकबाल (७४) आणि शादमान इस्लाम (२७) धावा केल्या. तमीमने ११४ चेंडूत १० चौकार मारले. बांगलादेशचे इतर ९ गडी ९२ धावा काढून बाद झाले. यष्टीरक्षक लिटन दासने ३३ धावांची खेळी करून संघास हातभार लावला.
न्यूझीलंडकडून नील वेगनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज ३८ धावांत तंबूत परतले. टॉम लॅथम (४)आणि जीत रावल(३) हे स्वस्तात माघारी परतले. दिवसअखेर केन विलियमसन १० तर अनुभवी रॉस टेलर १९ धावांवर नाबाद परतले.