महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने रचला धावांचा डोंगर, कर्णधार विलियमसनचे द्विशतक - 307

न्यूझीलंडचा पहिला डाव ६ बाद ७१५ धावांवर घोषीत

New Zealand

By

Published : Mar 2, 2019, 3:06 PM IST

हॅमिल्टन - बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने धावांचा डोंगर रचला आहे. बांगलादेशला पहिल्या डावात २३४ धावांवर गारद केल्यानंतर फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंड संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात ७१५ धावा केल्या.

रॉस टेलर वगळता न्यूझीलंडच्या सगळ्याच फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. सलामिवीर टॉम लॅथम (१६१) आणि जीत रावल (१३२) या दोघांनी शानदार शतकी खेळी साकारल्यानंतर आलेल्या कर्णधार केन विलियमसने २०० धावा करत द्विशतक साजरे केले. या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. तर हेनरी निकोल्स (५३) आणि कॉलिन डी ग्रँडहोम (७६) यांनी अर्धशतके करत न्यूझीलंडची धावसंख्या सातशेपार नेली.

न्यूझीलंडने ६ बाद ७१५ धावा अशी स्थिती असताना आपला पहिला डाव घोषीत केला. यानंतर मैदानात आपला दुसरा डाव खेळण्यासाठी आलेला बांगलादेश संघाने तिसऱ्या दिवसअखेर ४ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या आहेत. या सामन्यात बांगलादेश अजूनही ३०७ धावांनी पिछाडीवर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details