कोलंबो -यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचे जेतेपद इंग्लंडने जिंकले असले तरी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने लोकांची मने जिंकली. या सामन्यानंतर, त्याच्या लोकप्रियतेमध्ये तुफान वाढ झाली. विश्वकरंडक स्पर्धेत विल्यमसनने ज्या प्रकारे आपल्या संघाचे नेतृत्व केले त्याचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.
चालू सामन्यादरम्यान विल्यमसनने कापला आपल्या वाढदिवसाचा केक.. - ८ ऑगस्टला विल्यमसनचा वाढदिवस
काल गुरुवारी ८ ऑगस्टला विल्यमसनचा वाढदिवस होता.
काल गुरुवारी ८ ऑगस्टला विल्यमसनचा वाढदिवस होता. तो आणि न्यूझीलंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. १४ ऑगस्टपासून त्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्याअगोदर, न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंका बोर्ड प्रेसिडेंट इलेवन संघाविरुद्ध सराव सामना खेळला. या चालू सामन्यादरम्यान, विल्यमसनने त्याच्या चाहत्यांनी आणलेला केक कापला. न्यूझीलंडचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना विल्यमसन आणि त्याच्या चाहत्यांचा हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चौकाराच्या सीमारेषेवरच हा केक कापण्यात आला. त्यानंतर, चाहत्यांनी हा केक विल्यमसनला भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि फोटोसुद्धा काढले. त्याचे हे फोटो श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, विल्यमसनला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने या स्पर्धेत ५०० धावा केल्या आहेत.