सिडनी - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता. ३ ) रंगणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने विजयी संघ कायम ठेवला आहे. तर न्यूझीलंडने संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात कुठलाही बदल होणार नसल्याचे, ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघात, कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस हे दोघेही आजारी आहेत. यामुळे अंतिम सामन्यात दोघेही खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
दरम्यान, न्यूझीलंड संघाने ऐनवेळी ग्लेन फिलिप्सला पाचारण केले आहे. यामुळे तो अंतिम ११ मध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३ सामन्याच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत पराभव पत्करावा लागला आहे. यातील पर्थ कसोटी ऑस्ट्रेलियाने २९६ तर मेलबर्न कसोटी २४७ धावांनी जिंकली आहे.
- ऑस्ट्रेलियाचा संघ -
डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ट्रॅव्हिस हेड, टिम पेन, जेम्स पॅटिंसन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियोन.
हेही वाचा -कृणाल पांड्याने अतरंगी शब्दात केले होणाऱ्या वहिनीचे स्वागत...
हेही वाचा -मॅटर्निटी लिव्ह...! जेस डफिन ठरली पहिली महिला क्रिकेटर