बर्मिंघन -आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चा २५ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात बर्मिंघनच्या मैदानावर रंगला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसन आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी केलेल्या संयमी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून विजय मिळवला.
CRICKET WC : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत न्यूझीलंडची आफ्रिकेवर मात, कर्णधार विल्यमसनचे शतक - Kane Williamson
आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २४२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ३ चेंडू आणि ४ विकेट्स राखून पूर्ण केले
आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २४२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ३ चेंडू आणि ४ विकेट्स राखून पूर्ण केले. या सामन्यात कर्णधार केन विलियम्सनची नाबाद १०३ धावांची खेळी आणि मोक्याच्या वेळी ग्रँडहोमने ठोकलेल्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडला विजय मिळाला. या विजयामुळे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड टॉपवर पोहचली आहे, तर या पराभवामुळे २०१९ विश्वचषक स्पर्धेतले दक्षिण आफ्रिकेचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना दीड तास उशिरा सुरू झाला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. मात्र, हाशिम आमला आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी डाव सावरल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला २४१ धावांचे लक्ष दिले. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने संयमी शतकी खेळी करून नाबाद १०३ धावा केल्या. तर मधल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोमने ६० धावा काढत त्याला चांगली साथ दिली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना जिंकला.