ख्राईस्टचर्च - न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ओव्हल मैदानावर पार पडला. यात न्यूझीलंडने बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह यजमान संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बांगलादेशच्या संघाने ५० षटकात ६ बाद २७१ धावा केल्या. यात तमीम इक्बाल (७८) आणि मोहम्मद मिथून (नाबाद ७३) यांनी अर्धशतक झळकावली. तर सौम्या सरकार (३२), मुश्फिकूर रहिम (३४) यांनी आपले योगदान दिले. न्यूझीलंडकडून मिशेल सँटनरने २, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि कायले जेमिन्सन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
बांगलादेशचे आव्हान न्यूझीलंडने १० चेंडू आणि ५ गडी राखत पूर्ण केले. टॉम लाथमने १०८ चेंडूत नाबाद ११० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याला डेवॉन कॉन्वे ७२ धावा करत चांगली साथ दिली. यजमान संघाची अवस्था एकवेळ ३ बाद ५३ अशी झाली होती. तेव्हा लाथन आणि कॉन्वे या दोघांनी ११३ धावांची भागिदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमान आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. उभय संघातील तिसरा सामना २६ मार्चला वेलिंग्टन येथे होणार आहे.
हेही वाचा -Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ
हेही वाचा -इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारताचे टॉप-३ फलंदाज, पहिला तर आहे खास