महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा - बांगलादेशचा न्यूझीलंड दौरा २०२१ न्यूज

बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाने आपला संघ जाहीर केला आहे.

new-zealand-announced-t20-squad-for-bangladesh-series
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

By

Published : Mar 23, 2021, 5:06 PM IST

वेलिंग्टन - बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज टिम साऊदी या संघाचे नेतृत्व करणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, कायले जेमिन्सन, जिमी नीशम आणि टिम सेफर्ट यांना विश्रांती दिली आहे. पुढच्या महिन्यात आयपीएल सुरू होणार आहे. यासाठी या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पण ईश सोधी आणि मार्टिन गुप्टिल ही मालिका खेळणार आहेत.

लॉकी फर्ग्युसन आणि अ‍ॅडम मिलने हे दुखापतीनंतर, बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करणार आहेत. तर फिन अॅलन आणि विल यंग यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, उभय संघात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे.

न्यूझीलंडचा संघ -

टिम साऊदी (कर्णधार), फिन अॅलन, टॉड एश्ले, हमीश बेनेट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉन्वे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अ‍ॅडम मिलने, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी आणि विल यंग.

हेही वाचा - Ind vs Eng : मायकल वॉनची भविष्यवाणी, म्हणाला 'हा' संघ ३-० ने मालिका जिंकेल

हेही वाचा - Ind vs Eng : कृणाल-कृष्णाचे टीम इंडियात पदार्पण, पांड्या ब्रदर्स भावूक

ABOUT THE AUTHOR

...view details