महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडचा भारताला धक्का, २९ धावांनी केला पराभव - ind vs nz a 2nd odi news

नाणेफेक जिंकून भारताच्या 'अ' संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडच्या 'अ' संघाने जॉर्ज वॉकरच्या १३५ धावांच्या जोरावर ५० षटकात ७ गडी गमावत २९५ धावा केल्या.

New Zealand-A beat India-A in second unofficial ODI
न्यूझीलंडचा भारताला धक्का, केला २९ धावांनी पराभव

By

Published : Jan 24, 2020, 3:01 PM IST

ख्राईस्टचर्च - एकीकडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला. तर, दुसरीकडे याच दोन्ही देशांच्या 'अ' संघात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. त्यामध्ये न्यूझीलंडच्या 'अ' संघाने भारत 'अ' संघाचा २९ धावांनी पराभव केला.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपन : २४ व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले, सेरेना विल्यम्स स्पर्धेबाहेर

नाणेफेक जिंकून भारताच्या 'अ' संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडच्या 'अ' संघाने जॉर्ज वॉकरच्या १३५ धावांच्या जोरावर ५० षटकात ७ गडी गमावत २९५ धावा केल्या. भारताकडून इशान पोरेलने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर, मोहम्मद सिराजने दोन फलंदाजांना माघारी धाडले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय 'अ' संघ ९ गडी गमावत २६६ धावा करू शकला. क्रुणाल पांड्याने ५१, विजय शंकरने ४१ आणि इशान किशनने ४४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कायल जेमीसन, जेकब डफी, जिमी नीशमने प्रत्येकी २ बळी घेतले.

या विजयासह न्यूझीलंड 'अ' संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. रविवारी अंतिम सामना खेळला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details