नवी दिल्ली - टीम इंडियाची वेस्ट इंडिज मालिका सुरू आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या टी-२० मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला. पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या नवदीप सैनीने दमदार प्रदर्शन करत संघाच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलला. याच सामन्यात सैनीला एक मोठी ताकीद मिळाली आहे.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात नवदीप सैनीला मिळाली मोठी 'WARNING'! - t20 match
सैनीला आयसीसीच्या आचारसंहितेचा उल्लंघन केल्याप्रकरणी ताकीद मिळाली आहे.
सैनीला आयसीसीच्या आचारसंहितेचा उल्लंघन केल्याप्रकरणी ताकीद मिळाली आहे. आयसीसीच्या लेवल- १ च्या नियमानुसार त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. पहिल्या टी-२० च्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला बाद केल्यानंतर सैनीने त्याला चूकीच्या पद्धतीने निरोप दिला होता.
या प्रकरणी सैनीने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्याला फक्त ताकीद मिळाली आहे. सैनीने आयसीसीच्या अनुच्छेद २.५ चे उल्लंघन केले आहे. यामध्ये खेळाडू, कोचिंग स्टाफ यांच्याविरुद्ध अर्वाच्य भाषा किंवा हावभाव यांचा उपयोग करण्यास मनाई आहे.