महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऐकलं का? पुढचे आयपीएल पाकिस्तानात होणार - उमर अकमल - डि कॉक

उमर बोलता बोलता पुढचे आयपीएल पाकिस्तानात होईल, असे म्हणाला.

उमर

By

Published : Mar 11, 2019, 12:54 PM IST

मुंबई- पाकिस्तानचा क्रिकेटर उमर अकमल वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे तो सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाला आहे. उमरने बोलता बोलता पुढचे आयपीएल पाकिस्तानात होईल, असे म्हणाला. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटिझन्सनेही यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.


आयपीएलच्या धर्तीवर पाकमध्ये पाकिस्तान प्रीमिअर लीगची (पीएसएल) सुरुवात करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव पीएसएलचे सामने शक्यतो युएईमध्ये खेळवण्यात येतात. फक्त प्लेऑफचे सामनेच पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातात.


उमर अकमल क्वेट्टा ग्लॅडिएटरकडून खेळतो. क्वेट्टाचा संघ पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी आला आहे. यानिमित्ताने घरच्या चाहत्यांना संदेश देताना उमर म्हणाला, आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत. संघाला चाहत्यांच्या भरपूर प्रेमामुळे चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. चाहत्यांचे प्रेम असेच राहिल्यास इंशा अल्लाह...ती वेळ लांब नाही जेव्हा पुढचे आयपीएल...सॉरी पीएसएल पाकिस्तानात होईल.


अकमलच्या या विधानावर नेटिझन्सनी भरपूर कमेंट दिल्या.


१. उमर अकमल नुकताच पाकिस्तानच्या संघात परतला आहे. आणि तो म्हणतो पुढचे आयपीएल पाकिस्तानात होणार आहे. सुबानल्लाह..


२. डोक्यात फक्त आयपीएलच चालू आहे...


३. आयपीएलचे किती वेड आहे भावा..शेजारचे लपवू पन शकत नाहीत.


४. त्याच्या फलंदाजीप्रमाणेच काहीही बरळतो.

ABOUT THE AUTHOR

...view details