महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पंतप्रधान मोदींच्या आवाहनला सचिन धावला, 'फिट इंडिया'साठी दिली वृध्दाश्रमाला भेट - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वृध्दाश्रमाचा व्हिडिओ ट्विट करून 'फिट इंडिया' अभियानाला पाठिंबा दर्शवला. सचिनेने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये तो वृद्धाश्रमातील महिलांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे. तसेच सचिनने वृध्दांसोबत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. याशिवाय सचिनने त्या वृद्ध महिलांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनला सचिन धावला, 'फिट इंडिया'साठी दिली वृध्दाश्रमाला भेट

By

Published : Aug 29, 2019, 3:29 PM IST

मुंबई - भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडूलकरने मुंबईतील सेंट अँथनी वृध्दाश्रमाला भेट देत मोदींच्या 'फिट इंडिया' अभियानाला पाठिंबा दिला. सचिनने वृध्दाश्रमाच्या भेटीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने, राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिट इंडिया अभियानाचा प्रारंभ केला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानात ‘फिट इंडिया’ अभियानाचा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी ‘फिट इंडिया’सारख्या अभियानाची जगातील प्रत्येक राष्ट्राला गरज असल्याचे सांगितले. तसेच या अभियानात सामील होऊन अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

मोदींच्या आवाहनानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वृध्दाश्रमाचा व्हिडिओ ट्विट करून या अभियानाला पाठिंबा दर्शवला. सचिनेने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये तो वृद्धाश्रमातील महिलांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे. तसेच सचिनने वृध्दांसोबत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. याशिवाय सचिनने त्या वृद्ध महिलांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details