लंडन -ऑस्ट्रेलियन ऑफ स्पिनर नॅथन लिऑनचा काउंटी क्रिकेट क्लब हॅम्पशायरशी केलेला करार रद्द झाला आहे. दोघांमधील हा करार परस्पर संमतीने रद्द करण्यात आल. लिऑन यंदाच्या हंगामासाठी हॅम्पशायर क्रिकेट क्लबमध्ये सामील होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे, सर्व घरगुती सामने २८ मेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.
हॅम्पशायर क्रिकेटचे संचालक गाइल्स व्हाइट यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की ही खरोखर खूप अनिश्चित आणि आव्हानात्मक वेळ आहे. सध्याच्या काळात क्रिकेट ज्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात आहे, ते पाहता आम्ही प्रत्येक प्रकारे योगदान देऊ.