लंडन -इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने सध्याचा इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सबद्दल मोठे विधान केले आहे. ''बेन स्टोक्स अगदी विराट कोहलीप्रमाणेच आहे आणि जागतिक क्रिकेटला एक नवा कोहली मिळाला आहे'', असे नासिर हुसेनने म्हटले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना 8 जुलै रोजी खेळवला जाईल. पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचे कर्णधारपद बेन स्टोक्सकडे असणार आहे. बेन स्टोक्स एक उत्तम कर्णधार म्हणून सिद्ध होईल, असेही हुसेन म्हणाला.
नासिर हुसेनने 'या' खेळाडूला म्हटले इंग्लंडचा विराट कोहली - nasser hussain latest news
हुसेनने एका क्रीडाविषयक कार्यक्रमामध्ये आपले मत दिले. ''सहसा स्टोक्स जे करतो ते कोहलीसारखेच असते. तो जे काही करतो, ते ताशी 100 मैल वेगाने असते. त्यामुळे मला वाटते की तो एक महान कर्णधार म्हणून सिद्ध होईल. काळजीवाहू कर्णधार म्हणून मी त्याच्यासमवेत आहे आणि तो एक उत्तम पर्याय आहे. तो रूटशी निष्ठावंत आहे."

विशेष म्हणजे कोरोनाव्हायरस नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. अशा परिस्थितीत या मालिकेचा उत्साह प्रेक्षकांमध्येही शिखरावर आहे. उभय संघात ही मालिका विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.