कराची - पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज नासीर जमशेदला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी १७ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जमशेदने पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला लाच देण्याचे कृत्य केले होते. त्यामुळे त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यात, नासीर जमशेदने खेळाडूंना खराब कामगिरी करण्यास सांगितले. हे प्रकरण समोर येताच जमशेद याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जमशेद या प्रकरणात दोषी आढळला. तेव्हा ही कारवाई करण्यात आली.