नागपूर - जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामान्य दरम्यान नागपूरकरांचा जोश बघण्यासारखा होता. सामना जरी क्रिकेटचा खेळला जात असला तरी मैदानाबाहेरील वातावरणात देशभक्तीच्या रसात नाहून निघाले होते. आमच्या प्रतिनिधीने भारतीय क्रिकेट संघाच्या रसिकांशी बातचीत करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी नागपूरकरांचा जल्लोष - ICC
जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दुसरा सामना खेळण्यात येत आहे
नागपूरकरांचा जल्लोष
भारत ऑस्ट्रेलियासोबतची टी-२० मालिका हरला असला तरी, एकदिवसीय मालिकेत पहिला सामना जिंकून भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कांगारूंचा पराभव करुन भारत मालिकेत २-० ने आघाडी घेण्याचा प्रयत्नात असणार आहे.