मुंबई- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात कमी झाला आहे. यामुळे देशाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सुरूवात करण्यात आली आहे. आजपासून मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेच्या मोसमाला प्रारंभ होत आहे. हिमाचल आणि छत्तीसगड यांच्यात स्पर्धेतील पहिला सामना खेळला जाणार आहे.
मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना व्यासपीठ मिळते. तसेच ही स्पर्धा आयपीएल लिलावाआधी होत आहे. यामुळे या स्पर्धेद्वारे खेळाडूंना चमक दाखवण्याचे एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे. याशिवाय शिखर धवन, सुरेश रैना आणि इशांत शर्मासारखे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट मैदानात पुनरागमन करतील.
एस. श्रीशांत देखील ही स्पर्धा खेळणार आहे. २०१३ मध्ये आयपीएलमधील मॅच फिक्सिंगप्रकरणी श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.