अबुधाबी -आयपीएलमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सहज पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भेदक गोलंदाजी आणि उत्तम फलंदाजीमुळे मुंबईने कोलकाताला ८ गड्यांनी मात दिली. या सामन्यात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी-कॉकने नाबाद ७८ धावांची खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली. कर्णधार रोहितनेही डी कॉकचे गोडवे गायले आहेत.
रोहित म्हणतो, ''मला डी-कॉकबरोबर खेळायला आवडते'' - रोहित शर्मा लेटेस्ट न्यूज
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी-कॉकने नाबाद ७८ धावांची खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली. कर्णधार रोहितनेही डी कॉकचे गोडवे गायले आहेत.
![रोहित म्हणतो, ''मला डी-कॉकबरोबर खेळायला आवडते'' mumbai skipper rohit sharma praises quinton de kock for his attacking approach](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9212660-thumbnail-3x2-dfdddd.jpg)
रोहित म्हणाला, ''मला विश्वास आहे, की नंतर फलंदाजी करणारा संघ आता आणखी सामने जिंकेल. या सामन्यात आम्ही पहिल्या चेंडूवर प्रभावी गोलंदाजी केली. ''मला डी-कॉकबरोबर खेळायला आवडते. बहुतेक वेळा तो आक्रमक वृत्तीचा अवलंब करतो आणि मी त्याच्या पाठीशी उभा राहतो.''
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताने २० षटकात १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने १६.५ षटकांत २ गडी गमावून हा सामना जिंकला. मुंबईकडून क्विंटन डिकॉकेनने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. डी-कॉकलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.