मुंबई- देशात सध्या निवडणुका सुरू आहेत. सोबतच इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) हंगाम देखील सुरू आहे. निवडणुकीच्या काळातही आयपीएल सामन्यांवरची सट्टेबाजी कमी झालेली दिसून येत नाही. मुंबई गुन्हे शाखेने आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मुंबईत आयपीएलवर सट्टा लावताना ५ जण ताब्यात - राजस्थान रॉयल्स
पोलिसांनी आरोपींकडून २६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टीव्ही, कार्ड-स्वॅपींग मचिन ९१ हजार रुपये जप्त केले.
जयपूर येथे १६ एप्रिल २०१९ रोजी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यावर बेटिंग सूरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने कांदिवलीत छापा टाकून ५ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतेलेल्या ५ जणांना याआधीही सट्टा खेळताना पकडण्यात आले होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडू २६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टीव्ही, कार्ड-स्वॅपींग मचिन ९१ हजार रुपये जप्त केले. आरोपी मुंबई, दिल्ली, जयपूरसह आंतराष्ट्रीय बुकींच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे.