महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा मुंबईवर ४ गडी राखून विजय - IPL

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावत केल्या होत्या १८७ धावा

राजस्थानचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

By

Published : Apr 13, 2019, 4:09 PM IST

Updated : Apr 13, 2019, 10:09 PM IST

मुंबई - आयपीएलमध्ये आज खेळल्या गेलेल्या २७ व्या सामन्यात रोमहर्षक राजस्थानने मुंबईवर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीस पाचारण केले होते. सलामीवीर क्विंटन डी कॉकचे शानदार ८१ धावांची अर्धशतकी आणि कर्णधार रोहित शर्माने ४६ धावांच्या जोरावर मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८७ धावा करत राजस्थानसमोर १८८ धावांचे आव्हान ठेवले. राजस्थानकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर जयदेव उनाडकट आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेचा अडसर दूर केल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. बटलरने यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानचा संघ विजयाच्या जवळ आलेला असतानाच, सॅमसन, बटलर, राहुल त्रिपाठी, लिव्हींगस्टोन, स्मिथ हे फलंदाज माघारी परतले. यामुळे राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरले होते. मात्र तळातल्या फलंदाजांनी राजस्थानचा विजय सुनिश्चीत केला.

Last Updated : Apr 13, 2019, 10:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details