महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL: आज रंगणार 'क्वालिफायर-१’ सामना, अंतिम फेरीसाठी मुंबई-चेन्नई आमने-सामने

आयपीएलच्या या सत्रात चेन्नई आणि मुंबई आतापर्यंत २ वेळा आमने सामने आले असून, दोन्ही वेळा मुंबईच्या संघाने चेन्नईचा पराभव केलाय.

अंतिम फेरीसाठी मुंबई-चेन्नई झुंजणार

By

Published : May 7, 2019, 4:39 PM IST

Updated : May 7, 2019, 4:49 PM IST

चेन्नई -आयपीएलचा बारावा मोसम आता अखेरच्या टप्प्यात आला असून आज 'क्वालिफायर-१’ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेला मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या स्थानी असलेला चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीच्या तिकीटासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत.


या सामन्यात जो संघ जिंकेल तो आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारणार आहे. तर पराभुत झालेल्या संघाला अजून एक संधी मिळणार असून क्वालिफायर-२ सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याची संधी त्यांच्यांकडे असेल. 'क्वालिफायर-१’ हा सामना आज (मंगळवारी) चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता खेळला जाणार आहे.


आयपीएल २०१९ मध्ये आतापर्यंत चेन्नई आणि मुंबई २ वेळा आमने सामने आले असून, दोन्ही वेळा मुंबईच्या संघाने चेन्नईला पराभवाचा दणका दिलाय. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला विजय मिळवायचा असल्यास सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करावी लागणार आहे.

रोहित शर्मा


मुंबईच्या फलंदाजीची जबाबदारी ही कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यावर असेल. तर गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, आणि मिचेल मॅक्क्लिनॅघनवर असेल

महेंद्रसिंह धोनी
चेन्नईत एम. एस. धोनी, सुरेश रैना, आंबती रायडू, शेन वॉटसन यांच्यासारखे स्टार फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, ईम्रान ताहीर हे महारथी असल्याने हा सामना अटीतटीचा होईल, यात काही शंका नाही.


असे असतील दोन्ही संघ

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी-कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मयांक मरकडे, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, अनमोलप्रीत सिंग, सिद्धेश लाड, अनुकूल रॉय, एव्हिन लेविस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), आदित्य तरे, रसिक सलाम, बिरदर शरण, जयंत यादव, ब्युरन हेंड्रिक्स, लसिथ मलिंगा.
  • चेन्नई सुपर किंग्ज -महेंद्रसिंह धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, ड्वेन ब्राव्हो, मोहित शर्मा, के. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन जगदीशन, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर.
Last Updated : May 7, 2019, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details