मुंबई- इंडियन प्रीमियर लीगचा ३ वेळा विजेता संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आज आपल्या अधिकृत टि्वटरवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या नव्या 'हिटमॅन'ची ओळख करून दिली आहे.
मुंबई इंडियन्सला भेटला रोहित शर्मापेक्षा चांगला खेळाडू - skipper
स्थानिक शालेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अभिनव सिंह या युवा खेळाडूने २६५ धावांची खेळी केली होती. यासह त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध रोहीतने एकदिवसीय सामन्यात केलेल्या २६५ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.
स्थानिक शालेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अभिनव सिंह या युवा खेळाडूने २६५ धावांची खेळी केली होती. यासह त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध रोहीतने एकदिवसीय सामन्यात केलेल्या २६५ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सनने टि्वटरवर अभिनवचा फोटो पोस्ट करत, 'आम्हाला रोहित शर्मापेक्षा चांगला खेळाडू भेटला असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये रोहितला टॅग करण्यात आले असल्याने, कर्णधार रोहित याला कसं प्रत्युत्तर देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
यावेळी आयपीएलच्या बाराव्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी २४ मार्चाला होणार आहे.