महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का - ipl 2020

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज खेळाडू केरॉन पोलार्ड सध्या दुखापतीमुळे बेजार झाला आहे. यामुळे त्याने पाकिस्तान प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. पोलार्डची दुखापत पाहता तो आयपीएलसाठी उपलब्ध होईल की नाही यावर साशंकता आहे. जर पोलार्ड आयपीएलआधी दुखापतीतून सावरला नाही तर हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे.

mumbai indians kieron pollard Withdrew from the psl competition for injury
IPL २०२० : आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

By

Published : Mar 10, 2020, 4:35 PM IST

मुंबई - आयपीएलच्या १३ हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशात गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा एक महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही यावर साशंकता निर्माण झाली आहे.

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज खेळाडू केरॉन पोलार्ड सध्या दुखापतीमुळे बेजार झाला आहे. यामुळे त्याने पाकिस्तान प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. पोलार्डची दुखापत पाहता तो आयपीएलसाठी उपलब्ध होईल की नाही यावर साशंकता आहे. जर पोलार्ड आयपीएलआधी दुखापतीतून सावरला नाही तर हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे.

पोलार्डने आयपीएलमध्ये १४८ सामने खेळताना २ हजार ७५५ धावा केल्या आहेत. यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने ५६ गडी बाद केले आहेत.

दरम्यान, आयपीएलवर कोरोनाचे सावट आहे. यामुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा -IND Vs SA : एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल

हेही वाचा -EXCLUSIVE: कुलदीप यादवशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित, पाहा काय म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details