महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्मा आला रे..! कसोटीत सलामीला येणार हिटमॅन

वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेत केएल राहुलने ४ डावामध्ये फलंदाजी करताना फक्त १०१ धावा केल्या आहेत. याविषयी बोलताना, भारतीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, 'यापुढे कसोटीच्या संघात रोहित शर्माचा समावेश सलामीचा फलंदाज म्हणून करण्यात येईल.' दरम्यान, अनेक वेळा संधी मिळालेल्या राहुलने मागील १२ डावांमध्ये फक्त एक अर्धशतक केले आहे.

रोहित शर्मा आला रे...! कसोटीत येणार सलामीला

By

Published : Sep 9, 2019, 11:19 PM IST

नवी दिल्ली - भारताचा कसोटी सलामीवीर केएल राहुलला मागील काही काळापासून 'आऊट ऑफ फॉर्म' आहे. यामुळे त्याच्या संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. केएल राहुलला अनेक वेळा संधी देऊनही त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याकारणाने आता निवड समितीने राहुलच्या ठिकाणी पर्याय शोधण्याचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा -प्रशिक्षक रवी शास्त्रींना घसघशीत पगारवाढ, मिळणार 'इतके' कोटी

वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेत केएल राहुलने ४ डावामध्ये फलंदाजी करताना फक्त १०१ धावा केल्या आहेत. याविषयी बोलताना, भारतीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, 'यापुढे कसोटीच्या संघात रोहित शर्माचा समावेश सलामीचा फलंदाज म्हणून करण्यात येईल.' दरम्यान, अनेक वेळा संधी मिळालेल्या राहुलने मागील १२ डावांमध्ये फक्त एक अर्धशतक केले आहे.

हेही वाचा -सचिन तेंडलकर : पदार्पणानंतर ५ वर्षांनी ठोकले पहिले शतक

प्रसाद यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, 'निवड समितीची जेव्हा पुढील बैठकीत होईल. त्या बैठकीत रोहित शर्माला सलामीवीर म्हणून ग्रहीत धरले जाईल.' विश्वकरंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा जमवणारा रोहित शर्मा 'इन फॉर्म' असताना संघाबाहेर आहे. यावर माजी कर्णधार सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण सारख्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details